१२५ मीटर पाण्यावर धावला लिलियांग

shi-liliang
बिजिंग : चीनच्या शाओलिन मंदिरातील एका भिक्खुने पाण्यावर धावण्याचा स्वतःचा जागतिक विक्रम मोडून काढला आहे. पाण्यावर ५ मीटरच्या अंतरावर धावण्याचा स्वतःचाच विक्रम मोडून काढत शाओलिन मंदिरातील शि लिलियांगने यंदा १२५ मीटर पाण्यावर धावला आहे. चीनच्या क्वान्जो शहराच्या शाओलिन मंदिरातील शि लिलियांगने या विक्रमासाठी २०० प्लायवुड्सचा वापर केला आहे.

याआधारे शि लिलियांग पाण्यावर १२५ मीटरचा अंतर पार करताना दिसत आहे. हे दिसते तेवढे सोपे काम नाही कारण पाण्यावर लावण्यात आलेले प्लायवुड्स पाण्याच्या सरावासह वाहताना स्पष्ट दिसत आहेत तरीही त्याने हा विक्रम पूर्ण केला आहे. लिलियांग यांनी सांगितले की, पाण्यावर धावण्यासाठी गतीमध्ये वेग पाहिजे आणि धैर्याचीही गरज असते त्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे. पाण्यावर धावण्याची ही कला चीनच्या मार्शल आर्टद्वारे अवगत करता येते. या कलेला चायनीज भाषेमद्ये शुईशांगपियाओ असे म्हटले जाते. यासाठी पाण्यावर तोल सांभाळता येणे अत्यंत गरजेचे असते. त्याच बरोबर एकाग्रताही यासाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची बाब आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर सर्वांत आधी असे लक्षात येते की, हा भिख्खू प्रत्यक्ष पाण्यावर नव्हे तर लाकडावर धावत आहेत; पण ज्या लाकडाच्या पट्ट्या टाकण्यात आल्या आहेत त्यांची जाडी ही १ सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही कमी असते. या पट्ट्या पाण्यावर तरंगत असल्या तरी त्यावर कोणत्याही प्रकारचे वजन राहू शकत नाही. आपण प्रयत्न केल्यास आपण त्यावर पाय ठेवता क्षणी पाण्यामध्ये कोसळण्याची शक्यता असते.

Leave a Comment