कुमारमंगलम यांनी खरेदी केला ४२५ कोटींचा बंगला

kumar
मुंबई – उद्योगपती कुमारमंगलम बिरला यांनी नुकताच मुंबईत एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. मात्र या बंगल्यासाठी या ‘लक्ष्मी’पतीने तब्बल ४२५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

मुंबईतील पॉश अशा मलबार हिल परिसरात हा बंगला खरेदी करण्यात आला आहे. जाटिया हाऊस असे या बंगल्याचे नाव आहे. या बंगल्यासाठी देशभरातून अनेक उद्योगपतीनी शेकडो कोटींची बोली लावली होती. अखेर कुमारमंगलम बिरला यांनी सर्वाधिक ४२५ कोटी रुपयांची बोली लावून या बंगल्यावर ताबा मिळवला. दिल्लीतल्या एका उद्योपतीने या बंगल्याची ४०० कोटी रुपयांच्यावर बोली लावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बोलीच्या वर २५ कोटी अधिक खर्च करुन बिरला यांनी हा सौदा पक्का केला. मुंबईतील पॉश इलाक्यात जवळपास तीन गुंठे परिसरात निसर्गरम्य ठिकाणी हा बंगला आहे.

Leave a Comment