भारतीय वंशाच्या मुलीची आईनस्टाईनवरही मात

lidiya
लंडन : ब्रिटनमधील मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये १६२ एवढे सर्वाधिक गुण मूळ भारतीय वंशाच्या असणा-या १२ वर्षीय लीडिया सेबेस्टियन या मुलीने मिळविले असून या परीक्षेमध्ये बुध्यांकाबाबत अलबर्ट आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांनाही लीडिया हिने मागे टाकले आहे. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लीडिया हिने मिळविलेल्या या स्पृहणीय यशामुळे सध्या जगभरात ती कौतुकाचा विषय बनली आहे.

लीडिया हिने कॅटल-३ बी पेपरमध्ये सर्वाधिक क्रमांक पटकावणा-या एक टक्के विद्याथ्र्यांमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. कॅटल-३ हा पेपर सर्वात अधिक बुध्यांक असणा-या मुलांसाठी असून, ही परिक्षा मेन्सा सोसायटीच्या नियंत्रणाखाली घेण्यात येते. या परीक्षेसाठी लीडिया हिने खूप परिश्रम घेतले होते. मात्र, याबाबत ती सुरुवातीला खुपच निराश होती. जेव्हा लीडिया परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी गेली, तेव्हा तिला सर्व सोपे वाटू लागले,
त्यामुळे ती तणावमुक्त झाली. लीडियाने पेपरमध्ये लिहिलेल्या भाषेबरोबरच तिच्या तार्किक क्षमतेची ही चाचणी घेण्यात आली. या सर्व चाचण्यांना ती यशस्वीपणे सामोरी गेली. लीडिया हिचे वडील अरुण सेबेस्टियन हे व्यवसायाने रेडियोलॉजिस्ट असून, आपल्या मुलीला आय क्यू टेस्टमध्ये विशेष आवड होती. तसेच याबाबत वेळोवेळी तिने माझ्या पत्नीशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment