महागला एअरटेल, आयडियाचा डाटा प्लान

combo
नवी दिल्ली : दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरने आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कु-हाड टाकली असून डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी आयडिया, एअरटेलने वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी पहिले तीन मुख्य ऑपरेटर एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन दिल्लीत २जी आणि ३जीच्या प्रीपेड दरांमध्ये ४७ टक्क्यांनी वाढ केली. अद्याप वोडाफोनने दिल्ली आणि इतर सर्कलमध्ये आपल्या पोस्ट पेड सेवेच्या डाटा प्लानच्या दरात वाढ केली नाही. कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एअरटेलने दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश पूर्व आणि उत्तर प्रदेश पश्चिम सर्कलमध्ये डाटाच्या दरात वाढ झाली आहे. तर आयडिया सेल्युलरने दिल्ली, पंजाब आणि पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये डाटाचे दर वाढविले. या दोन कंपन्यांच्या पोस्ट पेड ग्राहकांना आता १ जीबीच्या ३जी डाटासाठी ३०० रुपये खर्च करावा लागेल. आता हे दर २५० रुपये आहेत.

Leave a Comment