चीन, पाकिस्तान, इजिप्तचा कांदा पुसणार डोळे

onion
नवी दिल्ली : कांद्याने देशातील ग्राहकांना रडविल्यामुळे या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कांदा आयातीवर भर दिला असून, एमएमटीसीने १० हजार टन कांदा आयात करण्यासाठी टेंडर जारी केल्यामुळे चीनसह पाकिस्तान आणि इजिप्तचा कांदा ग्राहकांचे डोळे पुसायला आता धावून येणार आहे.

चीन, पाकिस्तान आणि इजिप्तमधून कांदा आयात करण्याची एमएमटीसीची योजना आहे. यातून कांद्याचे दर नियंत्रित करण्यास निश्चितच मदत होईल, अशी आशा आहे. या अगोदरही १० हजार टन कांदा आयात करण्यासाठी टेंडर जारी केले होते. मात्र, त्यावेळी फक्त एक हजार टन कांदा मिळाला. हा कांदा ४५ रुपये किलो दराने मागविण्यात येत असून, १० सप्टेंबरपर्यंत हा कांदा भारतात पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment