पॅनासोनिकचा इलुगा स्विच लाँच

switch
पॅनासोनिकने त्यांच्या इलुगा सिरीजमधील नवीन स्मार्टफोन इलुगा स्विच लाँच केला असून हा फोन अमॅझॉनवर १९९९० रूपयांत उपलब्ध केला जात आहे. हा फोन गनमेटल ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.

या फोनच्या लॉचिंग कार्यक्रमात पॅनासोनिक इंडियाचे मोबिलिटी डिव्हीजनचे प्रमुख पंकज राणा म्हणाले, युजर हा फोन अपराईट आणि इनव्हर्टेड स्विच करू शकणार आहेत आणि हे फिचर युजरना नक्कीच आवडेल असा विश्वास आहे. फोनला ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन ड्रॅगन ट्राईल ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. अॅंड्राईड ५.० लॉलीपॉप ओएस, २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, कार्डने वाढविण्याची सुविधा, शिवाय एड्रेनो ४०५ जीपीयूही दिले गेले आहे. १३ एमपीचा एलईडी फ्लॅशसह रियर तर ८ एम.पीचा फ्रंट कॅमेरा शियार अॅड्राईड बीम, लाईट सेन्सर, ई कंपास, थ्रीडी ऑडिओ क्वालिटी देणारे ड्युअल फ्रंट स्पीकर दिले गेले आहेत. फोरजी, थ्रीजी, यूएसबी, ओटीजी, वायफाय, जीपीएस, एजीपीएस, ब्ल्यू टूथ अशी कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment