कोलकात्यात लवकरच रोपवे वाहतूक

curvo
प.बंगालची राजधानी कोलकाता येथे प्रदूषणावर नियंत्रण आणण्यास सहाय्यकारी, वाहतूक कोंडी समस्येवर तोडगा आणि सिगल ट्रॅकवर चालणारी रोप वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. म्हणजे कोलकाता आता सर्व प्रकारच्या वाहनांचा वापर करणारे शहर ठरणार आहे.येथे पूर्वीपासूनच बस, रेल्वे,बोट, मेट्रो, ट्राम सारखी सावर्जनिक वाहतूक सेवा आहेच. त्यात आता या रोपवेची भर पडणार आहे. मात्र या रोपवे मुळे वाहतुकीत आश्चर्यकारक बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात कन्व्हेअर रोपवे सर्व्हिस प्रा. लिमी. चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक शेखर चक्रवर्ती म्हणाले, आम्ही जगातली पहिली नॉन लिनियर रोपवे सिस्टम कर्व्हो विकसित केली आहे आणि आम्ही त्याचे पेटंट मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत. लिनियर रोपवे कोणत्याही रस्त्याला कनेक्ट करता येतो. यात सध्या असलेल्या रस्त्यांवरच स्टील फ्रेम उभारून त्या रोपला सपोर्ट करण्याचे काम करतात. रस्त्यावरील जागा त्या अडवत नाहीत तसेच रस्ते वाहतूक तशीच सुरू राहते. ८ ते १० माणसे बसू शकतील अशा या केबल कार सुरक्षित, वेगवान, वीजेवर चालणारया ya असल्याचे प्रदूषण न करणार्‍या तसेच आवाज न करणार्‍या व तासाला साडेबारा किमी वेगाने जाणार्‍या आहेत. केबलची स्टेशन हवेतच असतात आणि त्यांना लिफ्ट बसविली जाते. केबल कार स्टेशनवर आली की दारे आपोआप उघडली जातात.

कोलकाता शहरात अनेक मार्गांवर दररोज तासाला २ लाख प्रवाशांची ने आण या केबल कार करू शकणार आहेत. शिवाय एअर अॅम्ब्युलन्स म्हणूनही त्या उपयोगात येऊ शकतील आणि प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटकाही करतील. सध्या कोलकाता शहरात दररोज ३ हजार बसेस चालतात आणि त्यासाठी ५ हजार लिटर इंधन वापरले जाते. त्यामुळे होणारे प्रदूषण या केबल कारमुळे कमी होणार आहे तसेच इंधन लागत नसल्याने तो पैसाही वाचणार आहे. कर्व्हो बांधण्यासाठी किमीला २० कोटी रूपये खर्च आहे मात्र तो मेट्रो पेक्षा एक दशांशने कमी आहे. प.बंगाल सरकारने सीआरएस प्रोजेक्ट मार्फत २५० मीटर लांबीचा असा मार्ग उभारला असून त्यावर व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्यासाठी वाहतूक विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment