भारतात यावर्षात ९५ हजार किलो सोने खरेदीचा अंदाज

jewellery
देशात सुरू झालेले सणवारांचे दिवस आणि लग्नसराईत यंदा सोन्याचे भाव घसरले असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोने, दागिने खरेदी करतील आणि यंदाच्या वर्षात साधारण ९५० टन म्हणजे ९५ हजार किलो सोने विकले जाईल असा अंदाज गोव्यात भरलेल्या इंटरनॅशनल गोल्ड कन्व्हेन्शन मध्ये बोलताना सीईओ मायकेल मेसारिक यांनी व्यक्त केला आहे. भारत हा जगातील दोन नंबरचा सोने आयातदार देश आहे.

सोन्याचे भाव जागतिक पातळीवरच घसरले आहेत. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यात दसरा दिवाळी सारख्या सणांना सोने दागिने खरेदी शुभ मानली जाते तसेच लग्नसराईसाठीही सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असते. यामुळे या काळात भारतीय ग्राहक दणकून खरेदी करेल असे जाणकाराचे मत आहे.

इंडिया बुलियनचे प्रमुख अधिकारी राजन वेंकटेश यांच्या मताने मात्र भारतात सोने खरेदी ग्राहक मोठा असला तरी यंदा पाऊस कमी झाला आहे. सोने खरेदी वाढेल की नेहमीइतकी राहिल हे पावसाच्या प्रमाणावरही अवलंबून राहिल. पाऊस समाधानकारक झाला तर सोने खरेदी वाढेल. कारण भारतात सोने खरेदी करणार्‍यांत ६० टक्के ग्राहक ग्रामीण भागातील आहे आणि तो प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला आहे.

Leave a Comment