चीनमधील उद्योजकाचे एका दिवसात बुडाले २ खरब रूपये !

china
बिजिंग : चीनमधील शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे एका श्रीमंत व्यक्तीला एका दिवसात ३.६ अब्ज डॉलर म्हणजे दोन खरब रूपयांचे नुकसान झाले आहे. चीनचा शेअर बाजार सोमवारी कोसळला, त्यात वैंग जियानलिन यांनी आपल्या कमाईतला १० टक्के हिस्सा एका दिवसात सोडावा. ही रक्कम त्यांची एका वर्षाची कमाई होती. ही माहिती जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा अभ्यास करणारी ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सने दिली आहे. वैंग हे चीनमधील रियल इस्टेट आणि मनोरंजन क्षेत्रातील बडे प्रस्थ आहेत.