भारतीयाने विकत घेतली ‘ईस्ट इंडिया कंपनी’

sanjeev-mehta
मुंबई – मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता यांनी १०० वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला विकत घेतली आहे.

१.५ कोटी डॉलरला ही कंपनी मुंबईतील एका हिर्‍याचा व्यापार करणार्‍या कुटुंबातील संजीव मेहता यांनी विकत घेतली असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर ईस्ट इंडिया कंपनीचे ४० भागधारकांकडून शेअर खरेदी केले आहेत. यावेळी संजीव मेहता म्हणाले की, हा खरेदी व्यवहार एका ‘आर्थिक व्यवहारा’पेक्षा जास्त ‘ भावनिक व्यवहार’ होता. ‘कधीकाळी भारतावर राज्य केलेल्या कंपनीला एका भारतीयाने खरेदी केले आहे. शिवाय ईस्ट इंडिया कंपनी आता नविन व्यवसायांना सुरूवात करणार आहे. तसेच ई – कॉमर्स माध्यमातून देखील विक्री सुरू करणार आहोत.