उभारी घेतलेला सेन्सेक्स पुन्हा कोसळला

share-market
मुंबई: आज भारतीय शेअर बाजाराने कालच्या ऐतिहासिक घसरणीनंतर उभारी घ्यायला सुरुवात केली होती. आज बाजार उघ़डताच सेन्सेक्स ३३० तर निफ्टीमध्ये १०० अंकांची वाढ पाहायला मिळाली. मात्र, थोड्याच वेळापूर्वी पुन्हा सेन्सेक्समध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय बाजारात काल चीनी चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे घसरण पहायला मिळाली. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये तब्बल १६२४ अंकांची घसरण झाली. तर निफ्टीतही ४९० अंकाची घसरण झाली होती. या घसरणीमुळे रुपयानेही गेल्या दोन महिन्यातील सर्वात निच्चांकी दर गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया आता ६६.४९ वर जाऊन पोहोचला आहे.