
नवी दिल्ली – आपल्या सर्व मोटारींच्या किमती ९ हजार रुपयांपर्यंत देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने वाढवल्या आहेत. मात्र नुकतीच बाजारात दाखल झालेल्या एस-क्रॉसच्या किमतीला मात्र हात लावण्यात आलेला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
महागल्या मारुतीच्या मोटारी
११ ऑगस्टपासून लागू असणारी भाववाढ ३,००० ते ९००० रुपयांपर्यंत असेल. वितरकांना देण्यात येणारे वाढीव मार्जिन आणि किमतीतील किरकोळ बदल यामुळे ही भाववाढ करण्यात येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत मोटार बाजारपेठेत कंपनीचा ४५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा कंपनीचा आहे.
मारुती सुझुकीने याआधी जानेवारीमध्ये उत्पादन शुल्क सवलत रद्द केल्यानंतर ३१,६०० कोटी रुपयांपर्यंत भाववाढ केली आहे. तर त्याआधी ऑक्टोबर २०१३मध्ये रुपयाचे अवमूल्यना फटका बसल्यानंतर कंपनीने १०,००० कोटी रुपयांपर्यंत भाववाढ केली होती.
