खुशखबर…. स्वस्त होणार पेट्रोल-डीझेल-एलपीजी

petrol
नवी दिल्ली – क्रूड ऑइलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल ४० डॉलरपर्यंत घसरल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डीझेलचे दर आणखी घसरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, चीनच्या इकॉनॉमीमध्ये येणाऱ्या घसरणीमुळे क्रूड ऑइलचे दर घसरत आहेत. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त होऊ शकते. अमेरिकेत सलग आठव्या आठवड्यात ऑइलचे दर घसरले आहेत.

अमेरिकेच्या ऑइल मार्केटमध्ये १९८६ नंतर एवढ्या मोठ्या काळासाठी घसरण राहण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे रुपया मजबूत होण्यास मदत मिळू शकते. गेल्या आठ आठवड्यांमद्ये अमेरिकेत क्रूड ऑइलच्या दरांमध्ये जवळपास ३३ टक्के घसरण झाली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये क्रूड ऑइल सेक्टरमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. ब्रेंट ऑइल प्राइसमध्येही २.७५ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे दर ४५.३३ प्रति बॅरल झाले आहेत. मार्च २००९ नंतर प्रथमच हे दर प्रति बॅरल ४५ डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment