बाजारातून ५९ करबुडव्या कंपन्या हद्दपार

sebi
नवी दिल्ली :भांडवली बाजार नियामक सेबीने करचुकवेगिरी प्रकरणी शेअर बाजाराचा वापर करणा-या ५९ कंपन्यांना बाजारातून हद्दपार करण्याची कारवाई केली. यामध्ये एचएनआयचाही समावेश असून हे प्रकरण पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपविले आहे.

रिद्धीसिद्धी बुलियन्स, वुडलँड रिटेल्स, महाकलेश्वर माईन्स, ग्यानदीप खेमका, शिर कमॉडिटीज अ‍ॅण्ड फ्युचर्स, अशोक कुमार दमानी, जयदीप हलवासिया, स्वरण फायनान्शिअल, गुरमीत सिंग आणि व्हिजन स्पाँज आयर्न आदींचा यात समावेश आहे. बीएसईच्या स्टॉक ऑप्शनमध्ये अनेक कंपन्या सातत्याने तोटा आणि काही कंपन्या सातत्याने नफा कमवत असल्याचे सेबीच्या लक्षात आले.

दरम्यान, महसूल सचिव शक्तिकांता दास यांनी पी-नोट्सबाबतची अनिश्चितता दूर करताना पी-नोट्सवर एकाएकी बंदी आणली जाऊ शकत नाही. सरकार याबाबतची स्थिती कशी सुधारता येईल हे पाहील, असे स्पष्ट केले. तसेच सरकारने गुरुवारी सेशल्सबरोबर करविषयक माहिती देवाण-घेवाण करार केल्याची घोषणा केली. करबुडव्या कंपन्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्यामुळे बाजारातील इतर कंपन्यांना आता धास्ती बसली आहे. सेबीच्या या कारवाईचा परिणाम म्हणून इतर कंपन्या आपला करभरणा नियमित करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment