ब्लॅकबेरीने आणला लाख मोलाचा स्मार्टफोन!

blackberry
मुंबई: प्रीमियम पी’९९८३ ग्रेफाइट हा स्मार्टफोन काही दिवसापू्र्वीच स्मार्टफोन उत्पादक कंपनी ब्लॅकबेरीने भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत तब्बल रु. ९९,९९० एवढी असून भारतीय बाजारपेठेतील हा सर्वात महाग स्मार्टफोन आहे. ब्लॅकबेरीचे यापूर्वी पोर्शेने तीन स्मार्टफोन डिझाइन केल्यानंतर आता हा पी९९८३ ग्रेफाइट चौथा स्मार्टफोन डिझाईन केला आहे.

कसा आहे लाख मोलाचा ब्लॅकबेरी पी’९९८३ ग्रेफाइट :
स्क्रिन ३.१ इंचाची, रेझ्युलेशन ७२०x७२० पिक्सलचे, प्रोसेसर १.५ GHz ड्युलकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एस४ चा आहे. रॅम २ जीबी, ऑपरेटिंग सिस्टम ब्लॅकबेरी १०, १६ जीबी इंटरनल मेमरी, १२८ जीबी पर्यत वाढविता येईल. रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आणि फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे.

Leave a Comment