आता हिंदीतून गुगलची व्हॉईस सर्च सेवा

google
मुंबई: आता भारतातला पाया भक्कम करण्यासाठी जाईट सर्च इंजिन गुगलने आणखी एक पाऊल उचलले असून आता हिंदी भाषेलाही गुगलचे सर्च इंजिन सपोर्ट करणार आहे. विशेष म्हणजे एखादी गोष्ट सर्च करताना ती टाईपदेखील करायची गरज उरणार नाही.

कारण सर्च इंजिन हे अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही भाषेचा पर्याय निवडायचा आणि नंतर फक्त ओके गुगल असे शब्द उच्चारायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती गुगलवर तातडीने उपलब्ध होणार आहे. शिवाय गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून इंग्रजीतून असलेला एखादा संदेश स्कॅन करुन हिंदी अनुवादातही पाहता येणार आहे.

भारतात असलेली मोठी लोकसंख्या पाहता आता गुगलने या प्रादेशिक भाषांमध्ये आपली सुविधा पुरवायला प्रारंभ केला आहे. हे त्यातले पहिले पाऊल आहे. शिवाय गुगल मॅपच्या माध्यमातून एखादा सर्च केलेला रुट हा सेव्ह करुन तो ऑफलाईनही पाहता येणार आहे. यूट्यूबच्या व्हिडिओसाठीही ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment