एअर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अश्वनी लोहानी

lohaniनवी दिल्ली – अश्वनी लोहानी यांची एअर इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून ते विद्यमान अध्यक्ष रोहित नंदन यांची जागा घेणार आहेत.

उद्या नंदन यांचा वाढवण्यात आलेला कार्यकाळ संपणार असून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लोहानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. लोहानी १९८० बॅचचे भारतीय रेल्वेचे अधिकारी आहेत. एअर इंडियाच्या सीएमडीपदी अश्वनी लोहानी यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते मध्यप्रदेश पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

रोहित नंदन १९८२ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नंदन यांना देण्यात आलेली दुसरी मुदतवाढ २१ ऑगस्ट रोजी संपत आहे. तोटयात असलेल्या एअर इंडियाला नफ्यात आणण्यासाठी रोहित नंदन चांगले काम करत असल्याने त्यांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.