लेनोव्होने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोन

lenova
मुंबई: लेनोव्होने भारतातील सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोन ए२०१० लाँच केला असून या स्मार्टफोनची किंमत रु. ४,९९० एवढी आहे.३ सप्टेंबरला ३ वाजेपासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरुन या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल सुरु होणार आहे. याची नोंदणी बुधवारपासून सुरु झाली आहे.

कसा आहे लेनोव्होचा ए२०१० : ४.५ इंचाचा डिस्प्ले, रेझ्युलेशन ४८०x८५४ पिक्सल एवढे असून प्रोसेसर १GHz मीडियाटेक ६४ बीट क्वॉड कोअरचा आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज, तसेच ३२ जीबीपर्यंत मेमरी क्षमता त्याचप्रमाणे ५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये ड्युल सीम, अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम, ब्ल्युटूथ, वाय-फाय, ४जी कनेक्टिव्हिटी त्याचप्रमाणे बॅटरीची क्षमता २००० mAh एवढी आहे.

Leave a Comment