‘लॉलिपॉप’नंतर आता गुगलचे ‘मार्शमेलो’

marshmallow
आईसक्रीम (४.०), जेलीबीन (४.१), किटकॅट (४.४), आणि लॉलिपॉप (५.०) नंतर गुगलचे ‘मार्शमेलो’ (६.०) या नावाचे अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. मार्शमेलो म्हणजे एक प्रकारचे शुगर कॅण्डी असते. परदेशात या मार्शमेलोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परदेशात मार्शमेलो बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे.

गुगलच्या इतर पारंपारिक नावांप्रमाणेच हे नाव देखील असून आपल्या पहिल्या अँड्रॉईड व्हर्जनचे नाव गुगलने कपकेक ठेवले होते. त्यानंतर डोनट, इनक्लेयर, फ्रोयो, जिंजरब्रेड, हनी कॉम्ब, आईस्क्रिम सँण्डविच, जेलीबीन, किट-कॅट आणि लॉलिपॉप यासारख्या गोड (स्वीट्स) पदार्थांची नावे देण्यात आली होती. त्यानंतर आता गुगल अँड्रॉईड ६.०चे नाव मार्शमेलो असणार आहे.

ट्विटरवर एक फोटो अपलोड करुन नव्या ओएस व्हर्जनचे नाव संपूर्ण जगासमोर गुगल अँड्रॉईडचे उपाध्यक्ष डेव बुर्केने आणले आहे. या नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नव्या फीचरचा समावेश करण्यात आला आहे.

या व्हर्जनबद्दल बोलताना, तोंडाला पाणी आणणारे अतिशय मऊ किंवा सोनेरी रंगाचे भाजलेले मार्शमेलो कुणाला आवडत नाहीत?, असा सवाल गुगलचे प्रकल्प व्यवस्थापक जमाल इसॉन यांनी अँड्रॉईड डेव्हलपर ब्लॉगवर लिहिताना विचारला आहे. ज्या डेव्हलपर्सना अँड्रॉइडसाठी नवीन अप्लिकेशन्स तयार करायची आहेत किंवा अपडेट करायची आहेत ते आता सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकतात, असंही इसॉन म्हणाले. नवीन ‘मार्शमेलो’चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर व सुधारीत पॉवर सेव्हिंग मोड असणार आहे.

प्रत्येक नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना किंवा ते अपडेट करताना युजर्सना संमतीची आवश्यकता भासणार नाही, असेही गुगलतर्फे सांगण्यात आले आहे. जगभरातील ऐंशी टक्के स्मार्टफोन युजर्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. दरम्यान, अनेकांकडे जुने व्हर्जन असल्याने त्यासाठी अपग्रेडची सुविधा उपलब्ध नाही. तसेच टॅबलेट करता अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम ही प्रभावशाली ठरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Leave a Comment