२५ पर्यटन स्थळांवर फ्री वायफाय

wifi
नवी दिल्ली: आता पर्यटकांना देशभरातील २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर वायफाय सुविधा मिळणार असून ही सुविधा पहिला अर्धा तास मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. या पंचवीस पर्यटन स्थळांमध्ये दिल्लीतला लाल किल्ला, मुंबईच्या एलिफन्टा गुहा, कर्नाटकातलं हंपी, फतेहपूर सिक्री,सारनाथ मंदिर, कोणार्क मंदिर, मध्यप्रदेशातल्या खजूराहो आणि ओडीशातल्या सूर्यमंदिराचा समावेश आहे. ताज महाल परिसरात सर्वात पहिल्यांदाही सुविधा सुरु करण्यात आलीय.

Leave a Comment