
नवी दिल्ली : समाजातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीमअंतर्गत लाभ मिळणार असून, रिक्षाचालक, अंगणवाडी, आशा सेविका यासह अन्य क्षेत्रातील सर्वच लोकांना ईएसआयच्या माध्यमातून आरोग्य विमा सुरक्षेच्या कक्षेत आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही आरोग्य विमा
संघटित क्षेत्रातील लोकांप्रमाणेच आता असंघटित क्षेत्रातील लोकांनाही आरोग्य विमा योजनेचा लाभ घेण्यास मदत मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर आपत्तीच्या काळात रोख रकमेचाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे. सरकारच्या वतीनेही असंघटित क्षेत्रातील लोकांना आरोग्य विमा कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महिन्याच्या प्रारंभी झालेल्या बैठकीत ईएसआयसीने असंघटित क्षेत्रापर्यंत सुविधा देण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
