ताडोबाच्या सफरीसाठी खास मिनीबसची सुविधा

tadoba
चंद्रपूर: चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झाली असून अवघ्या दोनशे रुपयांत ही एक दिवसाची सफर करता येणार आहे. दिवसातून दोन वेळा ही सुविधा उपलब्ध होणार आहे. चंद्रपूर शहरातून ही बस वर्षभर सोडली जाणार असल्याने जंगल भ्रमंतीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सामान्य पर्यटकांना खर्चिक ताडोबाच्या भ्रमंतीतून स्वातंत्र्य मिळाले आहे.

Leave a Comment