यूएईच्या व्यावसायिकांना भारतात गुंतवणूकीचे निमंत्रण

modi1
मसदार – संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण दिले असून भारतात यूएईच्या व्यावसायिकांना एक हजार अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची संधी असून, आपले सरकार यूएईच्या उद्योगपतींच्या गुंतवणूकीसदंर्भात काही समस्या असतील तर त्या सोडवायला तात्काळ प्राधान्य देईल असे मोदींनी सांगितले.

मोदींनी निर्णय न झाल्यामुळे जी शिथिलता आली आहे ती दूर करुन गुंतवणूकीला चालना देण्याचे काम करु असे सांगितले. मसदार शहरात यूएईमधील उद्योगपतींच्या परिषदेत बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. मागच्या ३४ वर्षात संयुक्त अरब अमिरातीच्या दौ-यावर गेलेले नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. संयुक्त अरब अमिरातीतील उद्योगपतींना भारतात पायाभूत सुविधा, ऊर्जा, बांधकाम या क्षेत्रात गुंतवणूकीची मोठी संधी आहे. तुम्ही भारतात या गुंतवणूक करा आपण दोघे मिळून २१ वे शतक आशियाचे शतक बनवू असे मोदींनी सांगितले.