ब्लॅकबेरीचा लाखमोलाचा पोर्श डिझाईनचा स्मार्टफोन सादर

blackberry
ब्लॅकबेरीने त्यांच्या प्रिमिअम स्मार्टफोन रेंजचा भारतात विस्तार करताना पोर्श डिझाईनचा पी ९९८३ ग्रॅफाईट स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनची किंमत आहे ९९९९० रूपये. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात आणला जात आहे. भारतात सणांचे दिवस तोंडावर असल्याची संधी साधण्यासाठी हा फोन सादर केला असल्याचे डायरेक्टर हितेन शहा यांनी सांगितले. ते म्हणाले भारतीय ग्राहकांसाठी आम्ही अल्टीमेट सुरक्षेसह युनिक स्टाईल देणारा हा स्मार्टफोन सादर करतो आहोत.

हा स्मार्टफोन गतवर्षी सादर केलेल्या पोर्श डिझाईन पी ९९९३ चे व्हेरिएंट आहे. तो ग्रफाईट मेटलिक कलर्ड एलिमेंट बेस्ट असून ब्लॅकबेरी पोर्श डिझाईन कॅलीबरेशननंतरचा हा चौथा स्मार्टफोन आहे. त्याला ३.१ इंची स्क्रीन,२ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. ८ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, वायफाय ८०२.११, ब्ल्यू टूथ ४.० एलटीई, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी, आणि यूनिक पिन फि चर दिले गेले आहे. फोनसोबत पोर्शच्या अॅक्सेसरीजही मिळणार आहेत.

Leave a Comment