पीकार कार- किंमत ४५ लाख, वेटिंगलिस्ट २ वर्षे

car
जुन्या डिझाईनच्या कारची तुम्हाला खास आवड आहे का किंवा तुम्हाला ऑटो रेसिंग आवडते का? मग तुम्ही या कारची माहिती घेणे आवश्यक आहे. मॉर्गन मोटर्सच्या १०० वर्षे जुन्या तीनचाकी वाहनाचे आधुनिक रूप घेतलेले एक हायब्रीड कार बाजारात आली आहे. पीकार नावाची ही कार वास्तविक तीन वर्षांपूर्वीच बाजारात आणली गेली आहे. कारची किंमत आहे ७० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ४५ लाख रूपये. आणि विशेष म्हणजे या कारखरेदीसाठी ग्राहकांनी अक्षरशः रांगा लावल्या असून कार मिळण्यासाठी २ वर्षांची प्रतीक्षायादी आहे.

८२ हॉर्सपॉवर इंजिन असलेली ही कार बेलारूसच्या इकोमोबिल कंपनीने मॉर्गन मोटर्सची नक्कल करून बनविली आहे. ही पॅडल इलेक्ट्रीक कार तीन चाकी आहे. ती चालविण्यासाठी पायांचा वापर करता येतो तसेच बॅटरीवरही ती चालते. जुन्या जमान्याची आठवण जागविणार्‍या कारची सजावट लाकूड, चामडे आणि सिलेंडरच्या आकाराचे इंजिन अशी आहे. तुम्ही पायाने चालवा अथवा बॅटरीवर या कारचा वेग मागच्या चाकांना लावलेल्या नेक्सर हबनेच नियंत्रित केला जातो. कारचा वेग आहे ताशी २५ मैल आणि त्यात एकावेळी एकच चालक बसू शकतो.

या कारसाठी ४५ लाख रूपये मोजण्याबरोबरच बेलारूसहून मागविण्यासाठीचा आयात खर्च दोन लाख रूपये ही करावा लागणार आहे. अर्थात ही कार चालविण्यातला रोमान्स ती चालविल्याशिवाय एन्जॉय करता येत नाही असे सांगितले जात आहे. कदाचित यामुळेच या कारच्या खरेदीसाठी २ वर्षे वेटिंग लिस्ट असावी.

Leave a Comment