ट्विटरवर आता ताजमहाल

tajmahal
नवी दिल्ली – आता ट्विटरवर जगातील सात आश्चर्यांपैकी एक असा भारतातील ताजमहाल आला आहे. स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ताजमहालच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे लाँचिंग केले.

यावेळी त्यांनी आपली पत्नी आणि मुलासोबतचा ताजमहालजवळील फोटोही शेअर केला. ट्विटर अकाउंट सुरु करण्यात आलेले ताजमहाल हे पहिले ऐतिहासिक स्थळ आहे. (@Taj Mahal) या नावाने हे अकाउंट सुरु करण्यात आले आहे.

ताजमहालच्या या ट्विटर अकाउंटवर तुम्ही तुमचे फोटो शेअर करु शकता. ट्विटर अकाउंट सुरु केल्यानंतर अवघ्या तासाभरातच हजारोहून अधिक फॉलोअर्स झाले.

ट्विटर अकाऊंट सुरु केल्यानंतर ट्विटरने पहिले ट्वीट केले. या ट्विटमध्ये जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक म्हणजे जे माझ्याकडे आले आहेत आणि जे मला फॉलो करत आहेत. आणि दुस-या प्रकारची माणसे म्हणजे ज्यांनी मला पाहिले नाही मात्र ते मला फॉलो करत आहेत. असे म्हटले आहे.

Leave a Comment