अवघ्या ३००० रुपयात गुगलचा अँड्राईड वन !

google
मुंबई: भारतात अँड्रॉईड वन हा प्रोजेक्ट पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत गुगल असून या नव्या अँड्रॉईड वन स्मार्टफोनची किमत ३००० रुपये असणार आहे. असेच काही स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन कंपनी येत्या काळात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

दक्षिण-पूर्व आशियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंद यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या नव्या प्रोजेक्टबाबत आम्ही फारच गंभीर असून पुढील काही आठवड्यातच अँड्रॉईड वनच्या नव्या प्लानचे लाँचिंग करण्यात येईल असे सांगितले आहे. या प्लॅनमध्ये गुगल जवळपास ३००० रुपयापर्यंत स्मार्टफोन लाँच करु शकते.

Leave a Comment