४५ किलो सोन्यानं मढवणार महालक्ष्मीची पालखी

mahalasmi
कोल्हापूर – कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची सुवर्णपालखी बनविण्याचे काम सुरू झाले असून ही पालखी येत्या नवरात्रापर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. साधारण ४५ किलो सोन्याची ही पालखी होणार आहे.

वाय. पी. पोवारनगर याठिकाणी पालखीसाठी सोन्यापासून मोर्चेल, चवर्‍या आणि आबदारी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. श्रीयंत्र तयार करून या कामाची सुरूवात झाली. ८ किलो सोन्यापासून पालखी बनवायला सुरूवात झाली आहे. अजून चाळीस कि लो सोन्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवापर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या सोन्याचा वापर करून मोर्चेल, आबदारी आणि चवर्‍या तयार करण्यात येणार आहे. पुढे जसे सोने उपलब्ध होईल तसेतसे पालखीचे सुवर्णकाम करण्यात येणार आहे. संगणकावर अत्यंत बारीक पण सुंदर नक्षी तयार करून ती हस्तेकलेत सोन्यावर उतरविण्यात येत आहे. कोल्हापूरमधील आठ कारागीर ही पालखी बनविण्याचे काम करत असून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

सोन्याच्या पालखीसाठी सोन संकलन करण्यासाठी १६ एप्रिल रोजी सुरूवात झाली होती. आतापर्यंत आठ हजार भक्तांनी या पालखीसाठी सोनं अर्पण केले आहे. ही पालखी येत्या नवरात्रोत्सावापर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे.

Leave a Comment