सोशल नेटवर्किंगमध्ये भारतीय लष्कर अव्वलस्थानी

army
मुंबई – सीआयए, एफबीआय, नासा यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर लोकप्रिय सरकारी वेबसाईटला मागे टाकत भारतीय सेना ही वेबसाईट फेसबुक रँकींगमध्ये अव्वल ठरली आहे. भारतीय लष्कराच्या फेसबुक पेजला ‘पीपल टॉकिंग अबाउट दॅट'(PTAT) रँकिंगमध्ये दुसऱ्यांदा पहिले स्थान मिळाले आहे.

भारतीय सेनेच फेसबुकवर पीपल टॉकींग अबाऊट दॅट रँकींगमध्ये मध्ये अव्वल आहे. भारतीय सेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, आमच्या सोशल मीडीयासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, दोन महिन्यांपूर्वीच आम्ही फेसबुक या सोशल मीडीयावर अव्वल स्थान पटकावले. केवळ फेसबुक पेजच नव्हेच तर भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाईटलाही दर आठवडय़ाला २५ हजारांपेक्षा अधिक लाइक मिळत आहेत. १ जून २०१३ ला सुरु केलेल्या भारतीय लष्कराच्या या फेसबुक अकाऊंट २९ लाखांपेक्षा अधिक लाईक मिळालेले आहेत. भारतीय लष्कराचे ट्विटरवरील फॉलोअर्स देखील साडेचार लाखांपेक्षाही अधिक आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमारेषेवर तर युद्ध सुरु असतेच पण फेसबुकवर देखील हीच परिस्थिती दिसतेय. भारत-पाक या दोन्ही देशात जिओ लोकेशनद्वारे एकमेकांचे फेसबुक पेज ब्लॉक केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील व्यक्ती भारतीय लष्कराचे फेसबुक पेज पाहू शकत नाही तसेच भारतातील व्यक्ती पाकिस्तान लष्कराचे फेसबुक पेज पाहू शकत नाही.

Leave a Comment