१५०० योगासनासाठी पेटंट घेण्याचा भारताचा प्रयत्न

yogasan
जगभरात योगाभ्यासाची वाढत चाललेली लोकप्रियता आणि योगाला मिळत असलेली जगमान्यता यामुळे वेळीच सावध झालेल्या भारताने आपल्या या परंपरागत ज्ञानाचे पेटंट अन्य कोणी घेऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्राचीन योग तंत्रावर पेटंट आणि ट्रेडमार्क मिळविण्याचा प्रयत्न अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या करत आहेत हे लक्षात आल्यानंतर ही पावले उचलली गेली आहेत.

भारताने देशाच्या या परंपरागत ज्ञानातून १५०० आसनांची निवड केली असून त्यातील २५० आसनांच्या व्हिडीओग्राफीचे काम पूर्ण झाले आहे. सरकारची ही योजना विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या वैज्ञानिक औद्योगिक अनुसंधान परिषदेमार्फत राबविली जात आहे. त्यांनी या पारंपारिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररी तयार करण्याचे काम हाती घेतले असून जे कोणी या आसनांचे पेटंट अथवा ट्रेडमार्क मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना दावा ठोकून आव्हान देणार आहेत असे संस्थेच्या अर्चना शर्मा यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या येत्या पाच सहा महिन्यात लायब्ररीचे काम पूर्ण होणार असून १५०० आसनांचा डेटाबेस तयार होत आहे. या आसनांवर कोणालाही पेटंट घेता येणार नाही. पश्चिमी देशांनी अनेक योगतंत्रांवर पेटंट जारी केले आहेत तर कांही जणांनी कॉपीराईट घेतले आहेत त्या सर्वांना आव्हान दिले जाईल. हळद आणि कडुनिंबाची पेटंट लढाई भारताला कांही कोटी रूपये खर्चून जिकावी लागली होती त्या अनुभवावरून ही योजना हाती घेतली गेली आहे.

Leave a Comment