भारतीय बाजारात आणखी एक स्मार्टफोन

panasonic
नवी दिल्ली- आणखी एक नवीन स्मार्टफोन जपानची मोबाईल कंपनी ‘पॅनासोनिक’ने बाजारात उतरवला असून या स्मार्टफोनचे नाव ‘पॅनासोनिक इलुगा आयकॉन’ असे असून याची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.

सोमवारपासून अॅमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर ‘पॅनासोनिक इलुगा आयकॉन’ या स्मार्टफोनची विक्री सुरू करण्यात आली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन रंगामध्ये उपलब्ध करून दिला आहे. तसेच यामध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment