भारत जगातील सर्वाधिक बीफ निर्यातदार देश

beef
भारताने यंदाच्या वर्षातही जगातले बीफ निर्यातीतले अव्वल स्थान कायम राखले असून या वर्षी बीफ निर्यातीत वाढच नोंदविली गेली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागातील आकडेवारीवरून बीफ निर्यातीत भारताचा पहिला तर ब्राझीलचा दुसरा क्रमांक आहे. अर्थात अमेरिकेत म्हशी आणि गाई दोन्हींच्या मासाला बीफच म्हटले जाते.

आकडेवारीवरून असे दिसते की भारताने २०१४ -१५ सालात आत्तापर्यंत २४ लाख टन बीफ निर्यात केले आहे. ब्राझीलने २० लाख टन बीफ निर्यात केले आहे. जगात ५८. ७ टक्के बीफ निर्यातीत भारताचा वाटा २३.५ टक्के आहे. गतवर्षी हेच प्रमाण २० टक्के होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार भारतातून म्हशींचे मास अधिक प्रमाणात निर्यात केले जाते व तेही आशियाई देशात अधिक निर्यात होते. व्हिएतनाम हा भारतातील बीफचा सर्वात मोठा खरेदीदार देश असून हे प्रमाण ४५ टक्के इतके आहे. २०११ पासून भारताच्या बीफ निर्यातीत वाढच नोंदविली जात असून २०१४ मध्ये बीफ निर्यातीतून झालेली ४८ लाख डॉलर्सची कमाई ही लोकप्रिय बास्मती तांदळाच्या निर्यात कमाईपेक्षाही अधिक होती असेही समजते.

Leave a Comment