असूसने बाजारात आणले चार नवे स्मार्टफोन

asus
नवी दिल्ली – असूसने सॅमसंग, मायक्रोमॅक्स, कार्बन या स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी चार नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले असून हे चार स्मार्टफोन झेडफोन सेल्फी, झेडफोन २ लेझर, झेडफोन २ डिलेक्स आणि झेडफोन मॅक्स असे आहेत.

तीन विविध पर्यायांमध्ये झेडफोन २ लेझर हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे. दोन जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत नऊ हजार ९९९ रुपये, तीन जीबी रॅम असलेला १३ हजार ९९९ रुपये आणि १७ हजार ९९९ रुपये असलेले हे तीन स्मार्टफोन आहे. तर झेडफोन २ डिलक्स स्मार्टफोनची किंमत २२ हजार ९९९ रुपये आणि झेडफोन सेल्फीची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. कंपनी झेडफोन मॅक्स हा स्मार्टफोन येत्या ऑक्टोबरमध्ये लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने गुलदस्त्यात ठेवली आहे.

Leave a Comment