सोनीचा एक्स्पिरिया झेड फाईव्ह या वर्षात येणार

xperia
सोनीने त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन एक्सपिरियाची पुढची आवृत्ती एक्सपिरीया झेड फाईव्ह व झेड फाईव्ह कॉम्पॅक्ट यंदाच्या वर्षात सप्टेंबरमध्ये बलीनमध्ये होत असलेल्या आयएफए २०१५ इलेक्ट्रोनिक शो मध्ये सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही परिषद २ सप्टेंबरला होत आहे.

दोन वर्षांपूर्वीच सोनीने दर ६ महिन्यांनी दोन फ्लॅगशीप प्रॉडक्ट कंपनी सादर करेल अशी घोषणा केली होती. त्यानसुार दरवर्षी दोन फ्लॅगशीप प्रॉडक्ट र्लांच केले जात आहेत. झेड फाईव्हच्या लिक झालेल्या फिचर्स नुसार या फोनसाठी २१ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा वाईड अंगलसह दिला जाणार आहे. ५.५ इंची डिस्प्ले, ४ जीबी रम, फिंगरप्रिंट स्कॅनर पॉवर बटणसह अशी त्याची अन्य वैशिष्ठ्ये असतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment