‘फ्लिपकार्ट’चे डिलीव्हरी बॉईज संपावर

flipkart
मुंबई : ‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स कंपनीच्या डिलीव्हरी बॉईजनी गेल्या आठवड्याभरापासून संपाचे हत्यार उपसले असून कंपनीच्या अधेरीतील कार्यालयावर डिलीव्हरी बॉईजनी घोषणाबाजी करत मोर्चा आणला.

फ्लिपकार्ट कंपनीचा विस्तार होत असतानाच कामाचा ताणही वाढला आहे, मात्र त्या तुलनेने कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांकडे मात्र कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डिलीव्हरी बॉईजनी केला आहे. दिवसेंदिवस त्रास वाढत चालल्यामुळे कंपनीच्या जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांनी मनसेच्या कामगार संघटनेसोबत फ्लिपकार्टच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. डिलीव्हरी बॉईजचा रुद्रावतार पाहून फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कंपनीने पोलिसांना पाचारण केल्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला.

Leave a Comment