ऑस्ट्रेलिया न्यायालयाने रद्द केला अदानी समुहाचा परवाना

adani
सिडनी – ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने ऑस्ट्रेलिया सरकारने मागील वर्षी कारमाइकल येथील कोळसा खोदाईचा भारतीय उद्योगपती अदानी यांच्या कंपनीला दिलेला परवाना रद्द केला आहे.

जगभरातील सर्वात मोठी कोळशाची खाण म्हणून कारमाइकल ही ओळखली जाते. मात्र काही पर्यावरण प्रेमींनी या खोदाईला विरोध करत याप्रकरणी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. लायसन्स देतेवेळी पर्यावरण मंत्रालयाने नष्ट होणाऱ्या प्राणीमात्रांविषयी कोणतीच गोष्ट लक्षात न घेता ही परवानगी दिली असल्याचे न्यायालयाने सांगितले. या खाणीतून ६ कोटी टन कोळसा निर्यात करण्यात येत असून भारतात तो अधिक पाठविण्यात येणार आहे.

Leave a Comment