सिमल्यात कुत्र्यांच्या चाव्याने पर्यटक हैराण

shimala
गेल्या कांही दिवसांपूर्वी माकडांमुळे पर्यटकांना सिमल्यात फिरणे आणि पर्यटनाचा आनंद लुटणे कठीण झाले होते त्यातच आता कुत्र्यांची भर पडली असून पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवसांत स्थनिक लोकांबरोबरच डझनावारी पर्यटकांनाही चावे घेऊन रूग्णालयाची वारी करण्याची पाळी आणली असल्याची बातमी आहे.

सिमल्यात गर्दीच्या स्कँडल पॉईंट, मॉल रोड व संजोला भागात दुपारच्या वेळी एक तासभर पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालून अनेकांना चावे घेऊन जखमी केले. ८ ते ९ पर्यटकांचाही समावेश आहे. स्थानिक लोकांनाही या कुत्र्याने चांगलाच प्रसाद दिला आहे..कुत्रे चावलेल्या सर्व लोकांना रूग्णालयात दाखल करून उपचार केले गेल्याचे समजते. या कुत्र्याने अचानक हल्ला करून लोकांच्या हाताला. पायाला चावे घेतले आणि कपडे ओढले असे समजते. यात बहुतेकांना मोठा रक्तस्त्राव झाला असेही समजते.

Leave a Comment