ट्रायंफची टायगर ८०० एक्सआर मोटरसायकल लाँच

tyger
ट्रायंफ मोटरसायकल कंपनीने त्याची टायगर ८०० एक्स आर मोटरसायकल भारतात नुकतीच लाँच केली असून तिची दिल्ली शो रूम किंमत १०.५० लाख रूपये आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनय सुंबळे म्हणाले ही गाडी रायडरला सवारीचा पुरा आनंद देईल असा आमचा विश्वास आहे.

टायगर मॅनर रायडिंग पोझिशन, हँडलिग व रिस्पॉन्सिव्ह इंजिन यामुळे भारतात अँडव्हेचर मोटरसायकल म्हणून ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरले असाही कंपनीचा दावा आहे. ही गाडी जादा आरामदायी आहेच पण इंधन बचत करणारीही आहे. ८०० सीसीचे थ्री सिलींडर इंजिन गाडीला दिले गेले आहे आणि इंजिनाचा आवाज कमी करण्यासाठी अनेक बदलही केले गेले आहेत. गियर सहजतेने बदलता येतील अशी सुविधा दिली गेली आहे.

भारतात मोटरसायकलची बाजारपेठ मोठी आहे आणि येथे संधीही विपुल आहे. तीन महिन्यातच कंपनीने त्यांची तिसरी मोटरसायकल भारतीय बाजारात सादर केली आहे असेही सुंबळे यांनी सांगितले. यापूर्वी कंपनीने एक्सआरएक्स व एक्ससीएक्स या दोन गाड्या सादर केल्या आहेत.

Leave a Comment