तब्बल ३७ कोटी रुपयांच्या नोटा पडून

currancy
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराज राजन यांच्याऐवजी माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची स्वाक्षरी देवास प्रेसने छापल्याने तब्बल ३७ कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत. छपाई कारखान्याची एक प्रिटींग मिस्टेक चांगलीच महागात पडली आहे.

कॅगच्या अहवालातून देवास प्रेसची ही चूक उघड झाली आहे. नियमानुसार आरबीआयच्या नोटा छापणा-या छपाई कारखान्यांनी २०१४ पासून छापलेल्या नोटांवर रघुराम राजन यांची स्वाक्षरी छापणे आवश्यक होते. राजन हे सप्टेंबर २०१३ मध्ये आरबीआयच्या गव्हर्नरपदी विराजमान झाले असून देवास छपाई कारखान्याला मात्र या नियमाचा विसर पडला. देवास कारखान्यात छापलेल्या २०, १०० आणि ५०० रुपयांच्या सुमारे २२.६ कोटी नोटांवर राजन यांच्याऐवजी त्यांच्या पूर्वीच्या गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची स्वाक्षरीच छापली. या नोटांची किंमत सुमारे ३७ कोटी इतकी आहे. आरबीआयने चूक निदर्शनास आणून देत नोट स्वीकारण्यास नकार दिल्यावर देवास प्रेसने ही चूक सुधारली. सध्या देवास प्रेसने छापलेल्या या नोटा सध्या बँकेत पडून आहेत.