जगभरात ‘योग उद्योग’ वाढीला

yoga
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी राजपथावर ३५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी योगासने करून गिनीज बुकात नाव झळकवले, भारतातही ‘योग उद्योग’ वाढीला लागला असून येत्या काही वर्षांत ती शेकडो कोटींची बाजारपेठ ठरण्याची शक्यता असल्यामुळे उद्योग क्षेत्राला नव्या संधी मिळत आहेत.

देशातील १ कोटी लोकांच्या योगासनांसाठी स्वतंत्र मॅट आणि खास पोशाखासाठी उद्योग आहे. जगभरात आजही २० कोटींहून अधिक लोक नियमित योगासने करतात. पैकी निम्मे भारतीय आणि अनिवासी भारतीय. दिल्लीत योगासन कार्यक्रमात सहभागींना गिनीज बुकाच्या प्रमाणीकरणानुसार क्रमांक लिहिलेल्या मॅट्स दिल्या होत्या, सर्वांनी विशिष्ट पोशाख घातला होता. मोदी सर्वांत पुढे साध्या सतरंजीवर साधा पांढरा लेंगा झब्बा घालून आसने करीत होते. कारण भारतीयांच्या दृष्टीने योगासनांच्या वेळी सतरंजी, सैलसर कपडे एवढ्याच गोष्टी पुरेशा असतात. देशात १ कोटी लोक योगासने करतात त्यासाठी मॅट, खास पोशाख करणारे उद्योग कधी उभे राहिले नाहीत. अमेरिकेत मात्र वेगळे घडले.

३० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा उद्योग योगासने अमेरिका, पाश्चात्य देशांत रुजवताना तेथील लोकांची गरज, मानसिकतेचा विचार गरजेचे होते. आपल्याकडे योगसाधनेला असणारा आध्यात्मिक आशय, रंग अमेरिकेत देणे अडचणीचे होते. पहिल्यांदा आध्यात्मिक गुरूंनीच योगासने अमेरिकेत रुजवली, हे खरे. पण अमेरिकेत उद्योजकांनी जेव्हा योगसाधनेमध्ये आर्थिक गुंतवणूक केली, तेव्हा योग‘फिटनेस फंडा’ म्हणून समोर आला आणि आज तो ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा उद्योग झाला आहे. यात योगासनांसाठी व्यायामशाळेप्रमाणे मोठे सभागृह उभे करणे, उत्तम प्रशिक्षक, योगासनांच्या वेळी वापरण्याच्या मॅट्स, विशिष्ट पोशाख यांचा समावेश आहे. त्यासह योगा पुस्तके, सीडी, डीव्हीडी यांची बाजारपेठही मोठी आहे. योग भारतीय असला, तरी त्याचा उद्योग उभा राहिला तो अमेरिका, कॅनडात हे लक्षात घ्या.

Leave a Comment