कर्मचार्‍यांना कोटींचा बोनस वाटणारा आयदिन

nevjan
कर्मचार्‍यांना जगात सर्वाधिक बोनस वाटण्याची कामगिरी तुर्कस्तानातील एका कंपनी मालकाने केली असून त्याचे नांव आहे नेवजत आयदिन. त्याने आपल्या ३७० कर्मचार्‍यांना दीड दीड कोटी रूपये बोनस म्हणून दिले आहेत. यामुळे त्याचे कर्मचारी भारावून गेले आहेत आणि अनेकांनी यामुळे आयुष्य बदलेल अशी भावनाही व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयदिन ऑनलाईन फूड ऑफरिंग सर्व्हिस येमेक्सपेती डॉट कॉम ही कंपनी चालवित होता. ५० लाख रूपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या कंपनीची खरेदी जर्मन डिलिव्हरी हिरो या कंपनीने तब्बल ३७.५० कोटी पौंडात केली. कंपनी विकल्यामुळे कर्मचार्‍यांना बोनस देण्याची कायदेशीर जबाबदारी आयदिनवर नव्हती. मात्र तरीही कंपनीच्या यशात या कर्मचार्‍यांचाही वाटा मोलाचा असल्याचे सांगत त्याने आपल्या कर्मचार्‍यांना दीड दीड कोटी रूपये बोनस म्हणून दिले. आयदिन आता जर्मन कंपनी डिलिव्हरी हिरोत मॅनेजमेंट टीम सदस्य म्हणून काम करणार आहे.

Leave a Comment