मॅगीवर प्रतिबंध लागला तरी नोकर कपात नाही

suresh
नेस्लेच्या मॅगीवर भारतात प्रतिबंध लावला गेला असला तरी कंपनीतील ७२०० कामगारांपैकी कुणालाच नोकरीवरून कमी केले जाणार नसल्याचे नेस्ले इंडियाचे नवनियुक्त प्रमुख सुरेश नारायणन यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले मॅगी उत्पादनावर जरी बंदी असली तरी हे काम करणार्‍या कामगारांना दुसरीकडे सामावून घेतले जाणार आहे. या कामगारांमध्ये पुन्हा एकदा स्वाभिमान आणि आत्मविश्वास परत आणला जाईल असेही त्यांनी सांगितले.

गेल्या ३० वर्षात मॅगीवर बंदी आल्याने प्रथमच नेल्सेला भारतात नुकसान सोसावे लागले आहे. मात्र तरीही कामगार कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या धक्क्यातून नेस्ले सहीसलामत बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त करताना नारायणन म्हणाले नूडल्स बनविणार्‍या कोणत्याच कंपनीची स्थिती सध्या ठीक नाही. नारायणन या पदावर येण्यापूर्वी फिलिपिन्समध्ये कंपनी प्रमुख म्हणून कार्यरत होते.

Leave a Comment