जुलै महिन्यात तब्बल ४०,७६० रॉयल एन्फील्डची विक्री

royal
नवी दिल्ली – जुलै महिन्यात आयशर डीव्हीजन मोटर्सच्या ४० हजार ७६० रॉयल एन्फील्ड दुचाकींची विक्री झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गतवर्षी जुलै २०१४ मध्ये प्रतिष्ठीत रॉयल एन्फील्ड कंपनीच्या २७ हजार ३१४ दुचाकी गाड्यांची विक्री झाली होती. यंदा देशातील रॉयल एन्फील्डच्या विक्रीत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी रॉयल एन्फील्डच्या एकूण २६ हजार ७९६ गाड्या विकल्या होत्या.

तसेच जुलै २०१४ मध्ये ५१८ रॉयल एन्फील्ड दुचाकी गाड्यांची निर्यात करण्यात आली होती. यंदा या निर्यातीत ७२ टक्यांनी वाढ झाली असून तब्बल ८९३ गाड्यांची निर्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment