पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता

petrol
न्यूयॉर्क – कच्च्या तेलाचा अधिक पुरवठा आणि किमतीत घसरण होत असली तरी कच्च्या तेलाचे उत्पादन सुरूच ठेवण्याच्या ओपेक म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टींग कन्ट्रींजच्या निर्णयाने परत एकदा तेलाच्या भावात मोठी घसरम पहायला मिळाली. त्याचा परिणाम म्हणून परत एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घसरण होण्याची शक्यता आहे.

युएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिडीएटच्या (डब्ल्यूटीआय) सप्टेंबरच्या पुरवठा दरामध्ये ३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यांच्या कच्च्या तेलाचा प्रतिबॅरेल दर १.४० डॉलरनी कमी होऊन ४७.५२ डॉलर प्रतिबॅरेल एवढ्यावर आला आहे.

यापूर्वीचआंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव उतरल्यामुळे काल रात्रीपासून भारतात पेट्रोल २.४३ रुपयांनी तर डिझेल ३.६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावामध्ये घसरण चालू असून उत्पादन पुरवठ्यापेक्षा अधिक होत आहे, तरी देखील ओपेक ने कच्च्या तेलाचे उत्पादन चालूच ठेवण्याचे संकेत दिल्यामुळे तेल कंपन्यांनी भावामध्ये कपात केली आहे. त्यामुळे परत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Comment