
नवी दिल्ली – लवकरात लवकर भारतीय बाजारात मॅगी नूडल्स परतेल असे, नेस्ले इंडियाचे नवीन प्रमुख सुरेश नारायणन यांनी म्हटले असून कंपनी आता इतर अनेक गोष्टींवरही लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बाजारात परतणार मॅगी
नारायणन यांची नुकतीच नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आली आहे. यापुढे डेअरी उत्पादने, चॉकलेट आणि खाऊच्या गोळ्यांवरही कंपनी अधिक लक्ष देणार असल्याचे नारायण यांनी स्पष्ट केले. निवडक माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
