अॅड्राईड डेस्कटॉपप्रमाणे वापरता येणारे रिमिक्स मिनी

remix
चीनी सॉफ्टवेअर कंपनी झाइड टेकने अॅड्राईड डेस्कटॉपप्रमाणे वापरता येईल असे डिव्हाईस बाजारात आणले आहे.त्यांनी अॅड्राईड बेस्ट मिनी पीसी रिमिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली असून युजरसाठी त्यात डेस्कटॉपचे फिचर्स देण्यात आले आहेत. मल्टी विंडो, मल्टी टास्किंग यांचा त्यात समावेश आहे. अर्थात यासाठी युजरला माऊस किंवा कीबोर्ड वापरावा लागेल तसेच मोठा स्क्रीनही वापरावा लागेल. मात्र यावर बहुतेक सर्व अॅड्राईड अॅप्स वापरता येणार आहेत.

या डिव्हाईसची किंमत एकदम खास आहे. सुरवातीला ऑर्डर देणार्‍या युजरला १ जीबी रॅम व ८ जीबी इंटरनल मेमरी असलेले डिव्हाईस २० डॉलर्स म्हणजे १२५० रूपयांत मिळणार आहे. त्याची प्रत्यक्षातली किमत आहे १८०० रूपये. २ जीबी व १६ जीबी इंटरनल मेमरीचे डिव्हाईस २५०० रूपयांना मिळणार आहे. या दोन्ही व्हर्जनसाठी यूएसबी पोर्ट, एक्स्टर्नल हार्डडिस्क कनेक्ट करण्याची सुविधा, मायक्रो एसडी लॉट, वायफाय, इथरनेट, ऑडिओ जॅक अशी फिचर्सही दिली गेली आहेत. आक्टोबर २०१५ पर्यंत जगातील सर्व प्रमुख शहरात हे डिव्हाईस विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.