इंडियनची ब्लॅकबुलेट स्काऊट बाईक

black
इंडियन मोटरसायकल्स त्यांच्या बाईक्ससाठी जगप्रसिद्ध आहेच.त्यांच्या स्काऊट बाईक बाईकप्रेमींसाठी अतिशय फेव्हरिट आहेत. या स्काऊट बाईकलाच बॉनविले सॉल्ट फ्लॅटवर कस्टम मेड करण्यात आले आहे. ब्लॅक बुलेट या नावाने ही बाईक तयार केली गेली आहे.

जेब स्कोलमन याने २०१५ इंडियन स्काऊटवर आधारित असे या बाईकचे डिझाईन केले आहे. त्यानेच मुनरोची स्पिरीट डिझाईन केली होती. ही बाईक २०१४ मध्ये थंडरस्ट्रोक १११ सेलिब्रेट करण्यासाठी त्याने बनविली होती. ब्लॅक बुलेटचे डिझाईन करण्यासठी स्कोलमनला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते आणि त्याला इंडियन स्काऊटचे इंजिन दिले गेले होते. स्कोलमनचे १९५० व ६० च्या दशकातील स्पीड मोटरसायकलवरून प्रेरणा घेऊन ब्लॅक बुलेट स्काऊट तयार केली असून ती ग्राहकाला त्याच्या गरजेनुसारही बनवून घेता येणार आहे.

Leave a Comment