शाओमीने आणला ३२ जीबीचा एमआय ४ आय

mi4i
मुंबई: बहुप्रतीक्षित ३२ जीबीचा एमआय ४आय व्हेरिएंट चायनीज कंपनी शाओमीने लाँच केला आहे. रु. १४,९९९ अशी या नव्या स्मार्टफोनची किंमत आहे. २८ जुलैला दुपारी २ वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

कसे आहेत एमआय ४ आयचे फिचर्स – या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५ इंचाचा असून तो फुल एचडी आहे. हा फोन ४ जी असून रेझ्युलेशन १०८०x१९२० पिक्सलचे आहे. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.० लॉलिपॉप बेस्ड MIU१६ असे आहे. रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम तर ३२ जीबीची इंटरनल मेमरी आहे आणि या फोनच्या बॅटरीची क्षमता ३१२० mAh आहे.