‘नासा’ला प्लुटोवर आढळली दुसरी ‘पर्वतरांग’

pluto
वाशिंग्टन – सध्या नासाच्या न्यू होरायझोन मोहीमेची जोरदार चर्चा होत आहे. या मोहिमेत प्लुटोबाबत कधीही माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होत असून त्यानुसार प्लुटो ग्रहाच्या भूमीवर दुसरी मोठी पर्वतरांग सापडली आहे. ही पर्वतरांग शुभ्र बर्फाच्छादीत पृष्ठभूमिवर तसेच उंचसखल अशा भागात वसलेली आहे.

प्लुटोच्या पृष्ठभागावरील डावीकडील बाजूस ज्वालामुखीसदृश पर्वतरांगा दिसून येतात. या उंच पर्वतरांगा ह्रदयाच्या आकाराच्या भागाच्या जवळ आहेत. प्लुटोच्या उत्तर-पश्चिम ध्रुवाकडे ही पर्वतरांग दिसून आली आहे. प्लुटोवरील या नवीन शीतल पर्वतांची उंची अंदाजे १.५ किमी उंच असून अमेरिकेतील अपालाचीयन पर्वताएवढी आहे. प्लुटोच्या पश्चिम भागातील या पर्वतरांगांना स्फुटनीक प्लॅनम असे म्हणतात. खालील आकृतीत प्लुटोची नवीन छायाकृती दर्शवण्यात आली असून त्यामध्ये चिन्हांद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

या छायाचित्रामध्ये नवीनतम, हिमाच्छादित, गडद काळोखमय पूर्वेकडील भाग दर्शवण्यात आला असून पश्चिम भागावर ज्वालामुखीच्या छटा दिसून येत असल्याचे ‘नासा’तील अवकाश संशोधन पथकाचे प्रमुख जेफ मूर यांनी म्हटले आहे.तसेच यातील गडद आणि प्रकाशमय भागाचे मिश्रण समजून घेता येऊ शकते असेही ते म्हणाले.

Leave a Comment