आता ६ महिने मिळणार प्रसूतीची रजा?

preganancy
नवी दिल्ली – नोकरदार महिलांसाठी प्रसूतीची तीन महिने असलेली रजा आता सहा महिने करण्यासाठी कामगार कायद्यामध्ये दुरूस्ती करण्याचा प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याकडून समजले आहे.

नोकरी करणार्‍या महिलांना कंपनीकडून सध्याच्या नियमानुसार तीन महिन्यांची कायदेशीर रजा मिळते. मात्र प्रस्तावित दुरूस्तीमुळे प्रसूतीच्या काळात तीन महिन्याऐवजी सहा महिने भरपगारी प्रसूती रजा मिळू शकते. यामुळे महिलांना आपल्या बाळाचे संगोपन करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल. महिलांच्या प्रसूती काळातील रजेमध्ये वाढ व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. देशातील काही आघाडीच्या कंपन्यांकडून प्रसूती झालेल्या महिला कर्मचार्‍यांना नियमापेक्षा जास्त रजाही मंजूर होते आणि त्यासोबतच काही फायदेही मिळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment